
कोल्हापूर: स्वातंत्र्यवीर सावरकर व्यक्ती आणि कार्य या विषयावर डाँ केशव ताशी यांचे व्याख्यान संपन्न झाले .येथिल स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळाने ने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. सुरूवातीला अध्यक्ष अविनाश सडोलिकर ,सावरकर प्रेमी श्री दाते ,कार्यवाह महेश धर्माधिकारी ,आत्मदर्शन संस्थेचे संजीव कुलकर्णी ,उद्योगपती नितीन वाडीकर यांचे हस्ते दिपप्रज्वलन करुन व सावरकर प्रतिमेचे पूजन करुन व पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. डाँ केशव ताशी यांनी सावरकरांच्या कार्याचा आपल्या ओघवत्या शैलीत आढावा घेतला . सावरकरांचे जीवन हेच ख-या अर्थाने एक महाकाव्य होत असे ते म्हणाले. सावरकरांचे अंदमानातील वास्तव्य व तिथं त्यांनी त्या बंदी अवस्थेतही कैदेत असताना केलेले कार्य त्यांनी विषद केले लोकमान्य टिळक यांच्या निधनाचे वृत कळाल्यावर त्यांनी त्या दिवशी अन्न ही घेतले नाही असा उल्लेख हि त्यांनी केला पाऊण हिंदुस्थान आपण स्वतंत्र केला आहे उर्वरित पाव हिंदुस्थान स्वतंत्र करण्याची जबाबदारी आपण पुढच्या पिढी कडे सोपवत आहोत असे सावरकर म्हणाले होते. भाषाशुध्दी , अस्पृश्यता निर्मुलन , महाकाव्य इत्यादी हिंदुत्ववादी सावरकरांचे पैलू त्यांनी विविध घटना , प्रसंगातुन श्रोत्यांसमोर दाखवून दिले स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तीतत्वावर विविध व्याख्याने आयोजित करण्याची संकल्पना असलेचे मंडळाचे कार्यवाह महेश धर्माधिकारी यांनी सांगितले .यावेळी डाँ केशव ताशी व श्री दाते यांचा सत्कार करणेत आला सीए विकास परांजपे ,किशोर देशपांडे ,उदय भेंडीगिरी , श्रीकांत वष्ट , रविंद्र तांबे , राजेद्र शिंदे ,अँड. सुनिल नाईक एस के कुलकर्णी डिजीपागडे व पुरोहीत परिवार यांच्या सह सावरकर प्रेमी उपस्थितीत होते.
Leave a Reply