
मुंबई :‘नकुशी’ आणि ‘पुढचं पाऊल’चा महासंगम
नव्या वर्षासाठी काही संकल्प मनात असताना मकर संक्रांतीसारखा गोड सण असणं हा दुग्धशर्करा योगच.यंदाची मकरसंक्रांत संस्मरणीय करण्यासाठी स्टार प्रवाहने यंदा प्रेक्षकांच्या घराघरात महासंक्रांत साजरी करण्याचे ठरवले आहे.
स्टार प्रवाहने आजवर आशयसंपन्न आणि उत्तमोत्तम कार्यक्रम सादर केले आहेत. मराठी संस्कृती जपतानाच ठेविले अनंते तैसेची राहावे हा विचार बाजूला सारत मराठी माणसाला त्याच्या क्षमतांची जाणीव करून देणाऱ्या आणि आता थांबायचे नाही हा विचार मांडणाऱ्या व्यक्तिरेखा आणि मालिका स्टार प्रवाहच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत. विशेष म्हणजे .त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळातो आहे.
अमाप लोकप्रियता लाभलेल्या ‘पुढचं पाऊल’ मधल्या अक्कासाहेबांच्या जोडीला यंदा लेक माझी लाडकी मधली मीरा,दुहेरी मधली मैथिली,गोठ मधली राधा आणि नकुशी या नव्या नायिका लोकप्रिय ठरल्या. या नायिकांच्या आयुष्यातल्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या महत्वाच्या प्रसंगांनी यंदाची महासंक्रांत स्टार प्रवाहवर येत्या १३ जानेवारीला संध्याकाळी साडेसहापासून साजरी होईल.यात महत्वाचे आकर्षण आहे ते म्हणजे नकुशी आणि अक्कासाहेब या सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या दोन नायिकांच्या मालिकेतल्या कथानकाचा महासंगम.
पुढचं पाऊल मध्ये सध्या ‘प्रेमाला जात नसते’ हा विषय हाताळला जातो आहे, जातीमुळे प्रेमाला विरोध असलेले तेजु आणि सत्या पळ काढून मुंबईला येतात ,त्यांच्या पाठी लागलेल्या गुंडापासून स्वत:चा जीव वाचवताना त्यांना नकुशी आणि चाळकऱ्यांची मदत मिळते. पळून आलेल्या या मुलांबद्दल रणजीतचे मत काहीसे वेगळे असते,याचवेळेस या मुलांचा माग घेत अक्कासाहेब बग्गीवाला चाळीत पोहचतात,नकुशी आणि रणजीतच्या नात्यात सध्या अबोला आहे,त्या पार्श्वभूमीवर अक्कासाहेब, नकुशी आणि रणजीतच्या नात्यात गोडवा आणू शकतील का ?,त्या पळून आलेल्या मुलांचे काय होते.या उत्कंठावर्धक प्रश्नांची उत्तरे या महासंगम मध्ये प्रेक्षकांना मिळतील. उपेंद्र लिमये आणि हर्षदा खानविलकर या दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना संध्याकाळी साडे सहापासून महासंगम मध्ये अनुभवता येईल.
Leave a Reply