

कोल्हापूर : खड्डा चुकवताना दुचाकीवरून ताबा सुटल्याने ट्रकच्या मागच्या चाकात सापडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर येथे घडली आहे. अमितराज बाळू पोवार (२६) रा. सरनोबतवाडी असे मृत युवकाचे नाव आहे. अमितराज हा वीज वितरण कार्यालयात नोकरीला असून ऑफीसच्या मिटींगसाठी तो व्हिनस कॉर्नर येथे येत होता. बस स्थानकाकडून तो दुचाकीने व्हिनस कॉर्नर येथे येत असताना खड्डा चुकविण्याचा प्रयत्नात गाडीवरील त्याचा ताबा सुटला. ताबा सुटल्याने तो तेथून चाललेल्या ट्रकच्या मागील चाकात अडकला व ट्रकचे चाक अंगावरून गेल्याचा त्याचा जागीच मृत्यू झाला.
अमितराज याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व एक महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. फक्त दीड वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले असून त्याला एक महिन्याचा मुलगा आहे. त्याच्या या अपघाती मृत्यूने सरनोबतवाडी येथे शोककळा पसरली आहे.
असे त्याचे नाव आहे.
Leave a Reply