
मुंबई:दर्जेदार मनोरंजनाचं नवं पर्व सुरू करताना नव्या वर्षाच्या प्रारंभाला ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ आणि ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या दोन नव्या मालिकांची खास पर्वणी झी मराठी आपल्या रसिकांसाठी घेऊन येतेय. ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या लोकप्रिय नाटकावर आधारित याच नावाची मालिका आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत तर त्यांच्या जोडीला आहेत लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने. येत्या १८ जानेवारीपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ तर १० वा. ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिका झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.
Leave a Reply