कोल्हापूर:कलात्मकता आणि श्रद्धा यांचा सुंदर मिलाफ असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी डायरी 2017 चा शानदार प्रकाशन सोहळा आज शाहू स्मारक येथे पार पडला. श्रीमंत युवराज्ञानी संयोगिता राजे छत्रपती आणि सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
या डायरीत प्रत्येक पानावर महालक्ष्मी श्लोक त्याच्या अर्थांसह दिलेले आहेत.तसेच कोल्हापूर ची पर्यटनासह वैशिष्ट्य पूर्ण माहिती आहे.सृजन डिझाइन्स चे सुनिल सुतार यांनी कैलिग्राफी म्हणजेच वैशिष्टयपूर्ण अक्षरशास्त्राचा सुरेख उपयोग या डायरीत केल्याने कोल्हापुरचा अभिमान वाटावा अश्याच डायरीची निर्मिति करण्याचे श्रेय विवेक वैजपुरकर, बाबासाहेब खाडे आणि सुनील सुतार यांना जाते अश्या भावना उपस्थित मान्यवरानी यावेळी व्यक्त केल्या.डायरीस सहकार्य लाभलेल्या सर्वांचे यावेळी सत्कार करण्यात आले. कार्यक्रमास दळविज आर्ट्सचे प्राचार्य अजय दळवी,कलानिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य व्यंकटेश बिदानुर,अरुण सुतार, आसमाचे अध्यक्ष प्रकाश रणदिवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सूत्र संचालन सौ. सीमा मकोटे,राजेंद्र मकोटे यांनी केले.
Leave a Reply