
कोल्हापूर: शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशुप्रदर्शन येत्या २७ ते ३० जानेवारी दरम्यान आयोजित केले असून यंदाचे प्रदर्शनाचे हे १० वे वर्ष आहे.यंदा यात विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग होणार असून पशु पक्षीदालन,विविध सांस्कृतिक कार्यक्रम,विविध तंत्रज्ञान यांच्यासह ३०० स्टॉल्सचा समावेश असणार आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.२०० स्टॉल्स बचत गटांना मोफत दिले असून प्रदर्शनाचे उद्घाटन माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्मिती करणाऱ्या रिलायंस पॉलीमर्स यांचे प्रायोजकत्व तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग,जिल्हा परिषद,यांचे सहकार्य लाभले आहे.चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात १० शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार,पिक स्पर्धा,पशु स्पर्धा जनावरांच्या विविध जाती,मोफत झुणका भाकरी,शेतीविषयक व्याख्याने असे भरगच्च कार्यक्रम ज्याचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच होईल.तरी या प्रदर्शनास जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी असे आवाहन भीमा उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी रिलायंसचे सत्यजित भोसले,बी न्यूज संपादक चारुदत्त जोशी,जे.पी.पाटील,प्रशांत पाटील.श्रीधर बिरंजे,क्रिएटीव्ह्जचे सुजित चव्हाण उपस्थित होते.
Leave a Reply