
कोल्हापूर: कोल्हापुरातील स्थानिक चॅनल बी च्या वर्धापनदिनानिमित दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भिमा फेस्टिवलचे आयोजन येत्या २३ आणि २४ जानेवारीला खासबाग मैदान येथे होणार केला असून रसिकांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अविस्मरणीय ठरेल.सोमवारी २३ जानेवारी रोजी जुनून हा हिंदी चित्रपटातील सुफी गाणी,कव्वाली,मुजरा यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आणि झी युवा चानल प्रस्तुत कल्ला हा गीत,संगीत,आणि विनोदी असा तिहेरी सांस्कृतिक कार्यक्रम २४ जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता होणार आहे.बेली डान्ससह विविध कालाविष्कार यात सादर होणार आहेत.गुरु प्रसाद ज्वेलर्स,गोकुळ दुध संघ प्रायोजक असून,हॉटेल चैताली,आणि जोतीबा हे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत.बी न्यूज स्टेशन रोड येथे मोफत प्रवेशिका उपलब्ध असून या सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन भिमा उद्योग समूहाचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
Leave a Reply