
कोल्हापूर :महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत ताराराणी विद्यापीठ स्पोर्टस क्लब यांनी अजिक्यंपद पटकावले. अंतिम सामना ताराराणी विद्यापीठ स्पोर्टस क्लब विरुध्द युनिव्हर्स एफ सी यांच्यात झाला. यामध्ये ताराराणी विद्यापीठ स्पोर्टस क्लब यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
आज सकाळी सेमीफायनल स्पर्धेत पहिला सामना ताराराणी विद्यापीठ स्पोर्टस क्लब विरुध्द राधाबाई शिंदे इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्यात खेळविण्यात आला. या सामन्यात ताराराणी विद्यापीठ स्पोर्ट्स क्लब यांनी 5-0 विजय मिळविला. ताराराणी कडून तेजस्विनी पाटील हिने 10,12,28 व्या मिनिटाला गोल नोंदवून संघास आघाडी मिळवून दिली त्यानंतर भक्ती पवार हिने 16 व्या मिनिटाला तर साक्षी सरनाईन हिने 25 व्या मिनिटाला गोल नोंदवून संघास 5-0 ने विजय मिळवून दिला.
दुसरा सामना युनिव्हर्सल एफ सी विरुध्द मास्कोट स्पोर्टस क्लब यांच्यात खेळविण्यात आला. यामध्ये युनिर्व्हसल एफ सी संघाने 3-0 गोल ने विजय मिळवला. युनिव्हर्सल एफ सी कडून मृदुल शिंदे हिने 5,16,28 व्या मिनिटाला गोल नोंदवून संघास विजय मिळवून दिला.
अंतिम सामना ताराराणी विद्यापीठ विरुध्द युनिर्व्हसल एफ सी यांच्यात खेळविण्यात आला. हा सामना संपुर्ण खेळ होईपर्यंत गोल 0 राहिल्याने ट्रायब्रेकर घेण्यात आला. ट्रायब्रेकरवर ताराराणी विद्यापीठाने 4-1 गोल ने विजय मिळवून अजिंक्य पद पटकावले. ताराराणी विद्यापीठाकडून मनाली बागडी, तेजस्वीनी पाटील, रसिका कांबळे, ऋतुजा सुर्यवंशी हिने गोल नोंदविला तर युनिर्व्हसल कडून फक्त पृथ्वी गायकवाड हिने गोल नोंदविला.
या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून ताराराणी विद्यापीठ स्पोर्टस क्लबच्या तेजस्विनी पाटील हिची निवड करण्यात आली.
या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ महापौर सौ. हसिना फरास यांच्या हस्ते करण्यात आला. प्रथम क्रमांक विजेत्या संघास रोख 21 हजार रुपये, चषक व गोल्ड मेडल देण्यात आले. उपविजेत्या संघास रोख रक्कम 11 हजार, चषक व सिल्वर मेडल देण्यात आले. तर उत्कृष्ट खेळाडूस रोख रुपये 3 हजार व ट्रॉफी देण्यात आली.
सुनिल पोवार, अवधूत गायकवाड, गजानन मनगुतकर, योगेश हिरेमठ, प्रदिप साळोंखे यांनी उत्कृष्ठ पंच म्हणून काम केलेबद्दल त्यांचा महापौरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमहापौर अर्जुन माने, महिला बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, उपसभापती वहिदा सौदागर, नगरसेविका उमा बनछोडे, अर्चना पागर, सविता भालकर, वनिता देठे, माजी नगरसेवक माणिक मंडलिक, क्रिडा प्रशिक्षक सचिन पांडव, दुर्वास कदम आदी उपस्थित होते.
Leave a Reply