
कोल्हापूर: कोल्हापुरातील सावली केअर सेंटर या सामाजिक संस्थेच्या इमारत उभारणी निधीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रचलित आणि अप्रचलित रचनांवर आधारित तेजोमय तेजोनिधी या कार्यक्रमाचे आयोजन २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे करण्यात आले आहे.फिअरलेस फौंडेशन च्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारलेला आहे.कलांगण,मुंबई,स्वा.सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई आणि मिरज येथील प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना सौ.धनश्री आपटे यांचा हा कलाविष्कार या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे.यातून जमणारा निधी हा सावली केअरच्या इमारत उभारणीसाठी देण्यात येणार आहे अशी माहिती सावली केअरचे किशोर देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या कार्यक्रमास पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
स्वा.सावरकरांनी मराठी भाषेला समृद्ध बनविले.गीताच्या माध्यमातून त्यांनी फक्त देशभक्तीच नाही तर याव्यतिरिकही अनेक भावपूर्ण काव्यरचना केल्या.अनेक मराठी शब्दांना जन्म दिला.या सावरकरांच्या भावना या प्रकट होण्यासाठी लोकांना समजण्यासाठी भारतीय शास्त्रीय नृत्यासारखा दुसरा मार्ग नाही.पारंपारिक नृत्य आणि सावरकरांच्या रचनांवर आधारित नृत्य याची योग्य आणि अचूक सांगड घातल्यानेच या कार्यक्रमास आज एका उंचीवर नेऊन ठेवण्यास आम्हाला यश मिळाले.अशा भावना नृत्यांगना आणि दिग्दर्शिका सौ.धनश्री आपटे यांनी व्यक्त केल्या.वर्षा भावे यांनी स्वरसाज चढविला असून संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे आहे.आणि सर्वात महत्वाचे निवेदन राहुल सोलापूरकर करणार आहेत.
अंथुरणाला खिळून राहिलेले वयोवृद्ध,अपंग,बेवारस,गतिमंद,मतीमंद अश्या सहा महिन्याच्या बाळापासून वृद्धांपर्यंत सर्व लोकांची सेवा सुश्रुषा कोहम मेंटल हेल्थकेअर आणि रिहबिलिटेशन सेंटर या संस्थेच्या माध्यमातून केली जाते.पिराची वाडी येथे सावली केअर सेंटरने २६ हजार स्क्वेअर फुट जागा घेतली आहे.भारतातील पहिला वाटर थेरपी टंक सह अत्याधुनिक सुविधा येथे असणार आहेत.याकरिता निधीची आवश्यकता भासणार आहे.म्हणूनच या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे अमित हुक्केरीकर यांनी सांगितले.अनेक वर्षांनी हृदयनाथ मंगेशकर या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरात येत आहेत असे महेश घोटखिंडीकर म्हणाले.या कार्यक्रमाच्या माध्यमातून सढळ हाताने मदत करावी असे आवाहन सावली केअरच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply