
कोल्हापूर : नोटबंदीचा विपरीत परिणाम हा संपूर्ण शेती व्यवस्थेवर झाला आहे.शेती मालाच्या कीमती घसरल्या.भाजीपाला फेकून द्यावा लागला.देशातला शेतकरी कर्जबाजारी असेल तर देशही कर्जबाजारी असतो, त्यामुळे शेतकरी संपन्न झाला तरंच देशही संपन्न होईल असं प्रतिपादन देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील भव्य कृषी व पशु प्रदर्शनाच्या उदघाट्न प्रसंगी केले.दरवर्षी कोल्हापूरमध्ये महाडिक समूहामार्फत कृषी प्रदर्शन भरवलं जातं. या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पवारांनी आजची शेती आणि तिची भविष्यातील परिस्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली. आज शेतकऱ्यांना पाठिंबा गरजेचा आहे असं सांगत नव्या तंत्रज्ञानाचा वापरही शेतकऱ्यांनी केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं.यात माती विरहित शेती,शेतीला पूरक मत्स्य शेती,गोपालन,दूध व्यवसाय यामुळे शेतकरी वाचेल.असेही ते म्हणाले.ऊस सोडला तर कुठल्याही शेत मालाला एफ आर पी नाही, एम आर पी नाही आणि शरद पवार यांच्या प्रेरणेतून कृषि प्रदर्शन गेली दहा वर्ष भरविले असे खा. धनंजय महाडिक सांगितले. शरद पवार कार्यक्रमास आल्याने महाडिक कुटुंबाचे सार्थक झाले अस माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले.
या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अनेक चर्चासत्रांचाही लाभ घेता येणार आहे. तर महाडिक समूहामार्फत यंदाचा भिमा कृषीरत्न पुरस्कार निवृत्त पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. अजित शिंदे यांना तर भिमा कृषी जीवन गौरव पुरस्कार हा हातकणंगले तालुक्यातील चोकाकच्या जनार्दन पाटील यांना देण्यात आला. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, महादेवराव महाडिक यांच्यासह नागिरक आणि शेतकरीही उपस्थित होते. पुढचे 4 दिवस हे कृषी प्रदर्शन सुरु राहणार आहे.
Leave a Reply