
कोल्हापूर: कोल्हापुरातील ख्यातनाम आर्किटेक्ट शिरीष बेरी यांना देशातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा जे.के.सिमेंट.ग्रेट मास्टर्स पुरस्कार जाहीर झाला आहे.गेली चार दशके त्यांनी आर्किटेक्चर क्षेत्रासाठी दिलेल्या भरीव योगदानाची दाखल घेत त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला.१९९० पासून भारतातील आर्किटेक्चर क्षेत्रातील ६० वर्षापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्या एकाच आर्किटेकची तर नजीकच्या देशातील दहा जणांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.या आधी हा पुरस्कार आर्किटेक्ट लारी बेकर,ए.पी.कानविंदे,जेफ्री बावा श्रीलंका,माझरुल इस्लाम,बांग्लादेश अश्या मान्यवरांना प्रदान करण्यात आले आहेत.असे शिरीष बेरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिरीष बेरी यांनी या क्षेत्रामध्ये केलेले व्यावसायिक कार्य,शैक्षणिक योगदान,त्यांनी केलेले लेखन,देशविदेशातील चर्चासत्रामध्ये घेतलेला सहभाग,पर्यावरणपूरक त्यांची डिझाईन्स,आणि त्यांच्या या क्षेत्राविषयीचा दृष्टीकोन या सर्वांची दखल घेत या पुरस्कारासाठी माझी निवड झाली यामुळे कोल्हापूर सेंटरचा गौरव झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेकच्या कोल्हापूर शाखेचे ते सल्लागार म्हणून कार्यरत होते त्यांना राष्ट्रीय स्तरावर ही अनोखी सलामी मिळाली अशी भावना कोल्हापूर सेंटरचे चेअरमन आर्किटेक्ट सतीशराज जगदाळे यांनी व्यक्त केली.पत्रकार परिषदेस संस्थेचे पदाधिकारी,बेरी कुटुंबीय आणि सहकारी उपस्थित होते.
Leave a Reply