कोल्हापूर: महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानवतीने कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराची उपलब्धता या उपन्गातर्गत सन २०१५ पासून एकूण ९०७ लाभार्थाना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षित लाभार्थ्यांना रोजगार व स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून देणेसाठी दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, (KMC कॉलेज) येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न झाला.
पंतप्रधानांच्या Skill India संकल्पनेस अनुसरुन कोल्हापूर शहरातील युवक युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करणे व त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या मेळाव्या मध्ये एकूण ५८२ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला व ५८२ लाभार्थानी मुलाखती दिल्या, त्यापैकी ४३० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. सदर रोजगार मेळाव्यास वेगवेगळ्या क्षेत्रातील १८ कंपन्या उपस्थित होत्या. ज्यामध्ये सेल्स एक्झीक्युटिव्ह, बॅंक ऑफिस एक्झीक्युटिव्ह, बॅंक ऑफिसर, ट्रेनी आय. टी. आय., ट्रेनी हेल्पर, स्टोअर क्लार्क, डिप्लोमा मेक्यानिक, डीझेल मेक्यानिक, ट्रेनी इंजिनीअर, असि. डेव्हलपमेंट मनेजर, जॉब मशीनिस्ट, टेली मार्केटिंग, एजुकेशन कौन्सिलर, ट्रेनी असिस्टंट,Eò®úº{ÉÉìxbÆ]õõ ¨ÉÉEæòË]õMÉ, कॉम्पुटर ऑपरेटर इत्यादी खाजगी आस्थापनावरील १०९१ पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.
Leave a Reply