
कोल्हापूर: जायन्ट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटी आणि जायन्ट्स ग्रुप ऑफ छत्रपती शाहू निगावे दुमाला या दोन्ही ग्रुपचा शपथविधी आणि पदग्रहण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.यात २०१७ या वर्षासाठी कार्यकारीणी निवड करण्यात आली होती.त्या कार्यकारिणीने आज विधीपूर्वक शपथ घेतली आणि आपला पदभार स्विकारला.रंकाळा चौपाटी ग्रुपच्या मावळत्या अध्यक्षा सौ.शारदा चेट्टी आणि निगावे दुमाला ग्रुपच्या मावळत्या अध्यक्षा सौ.वंदना अस्वले यांनी नूतन अध्यक्ष डॉ.शरदचंद्र दिवाण आणि कृष्णात चौगले यांना समारंभपूर्वक कार्यभार सुपूर्त केला.यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.तुम्ही आमच्यावर दाखविलेला विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू,आणि जायंट्सचे कार्य असेच पुढे नेऊ अश्या भावना नूतन अध्यक्षांनी व्यक्त केल्या.नवीन रंकाळा चौपाटी कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष सौ.शुभदा कामत,विजय विभूते,कार्यवाह अनिता काळे,खजानीस दिलीप जाधव,जनसंपर्क अधिकारी सौ.वैशाली कदम यांचा समावेश असून निगावे दुमाला ग्रुप कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष सुरेश कासार,सर्जेराव एकशिंगे,कार्यवाह तानाजी एकशिंगे,खजानीस बाळकृष्ण जाधव यांच्यासह संगीता राठोड,कांचन समुद्रे,सविता भीमटे,अलका पाटील,समीर शेख यांचा संचालक म्हणून समावेश आहे.यावेळी मान्यवरांची मनोगते झाली.जायन्ट्स ग्रुपच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात.यात कुटुंब नियोजन,राष्ट्रीय एकात्मता,ग्राहक जनजागरण,पर्यावरण जागृती,वृक्षारोपण,रक्तदान,देहदान,लेक वाचवा,नेत्रदान,शैक्षणिक उपक्रम आरोग्य शिबिरे,पाणपोई,अंधश्रद्धा निर्मुलन,महिला आणि मुलांसाठी विविध स्पर्धा यांचे सातत्याने आयोजन केले जाते.
कार्यक्रमास सल्लगार समितीचे आणि जायन्ट्स इंटरनॅशनलचे प्रमोद शहा,डॉ.मिलिंद सावंत,मंगलाताई कुलकर्णी,राजकुमार पोळ, अरविंद देशपांडे,सौ.बबिता जाधव तसेच संचालक सुनंदा मोरे,प्रकाश मोहिते,राजाराम मटकर आणि सदस्य शुभांगी तावरे,विजया चव्हाण,गणेश गावकर,वृंदा गायकवाड यांच्यासह सदस्य,संचालक आणि मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply