कोल्हापूर: केंद्र आणि राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता संचालनालय यांच्या वतीने स्वयं व रोजगार संधी उपलब्धता वाढविण्याकरिता आज विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.आज देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढते आहे या धर्तीवर युवकांना लगेच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्किलिंग इंडिया कंपनी स्थापन झाली.एक असे रोजगार निर्मिती केंद्र जिथे युवकांना एक स्मार्ट कार्ड दिले जाते.त्यात त्यांचा बायोडाटा प्रोफाईल लिंक केलेली असते.या कार्डमार्फत स्किलिंग इंडिया त्यांना त्यांच्या कौशल्यतेनुसार त्यांना रोजगार म्हणजेच नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे.तसेच उमेदवारांकरिता अतिशय माफक दरात तांत्रिक तसेच व्यावसायिक डीजीटलाईज प्रशिक्षण,आवश्यक परीक्षा पद्धती,वेळोवेळी होणारे इंडस्ट्री अपडेट,स्थानिक आणि खाजगी तसेच सरकारी रोजगार माहिती मिळणार आहे.पुणे,औरंगाबाद यांनतर कोल्हापूरसह सांगली सातारा सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील तरुणांना ही मोठी संधी आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रमुख महेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.स्किलिंग इंडिया तर्फे गावोगावी आणि शहरातून सर्व नव तरुणापर्यंत पोहचविणे आणि ही सर्व केंद्रे स्मार्ट एम्प्लॉयमेंट एक्सेंज म्हणून ओळखले जातील असेही कदम यांनी सांगितले.कोल्हापुरात धीरज रुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली असे केंद्र सुरु झालेले आहे.कोल्हापुरात स्टेशन रोड केव्हीज प्लाझा,आपटे नगर,महाद्वार रोड आणि उचगाव येथे केंद्र शाखा सुरु झाल्या आहेत.तसेच जवळपासच्या सर्व भागात केंद्रे लवकरच सुरु होणार आहेत.असे रामराज बावडेकर यांनी सांगितले.एकूणच स्मार्ट कार्डद्वारे नोंदणी करून बेरोजगार युवकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.तरी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि केंद्र सुरु करण्यासाठीच्या अधिक माहितीसाठी संपर्क ९८८३७७७१११ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Leave a Reply