
कोल्हापूर : नोटबंदीचा निर्णयामुळे सर्व क्षेत्रात मोठ्याप्रमाणत उलथापालथ झालेली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना जरी त्रास सहन करावा लागत असला तरी काळा पैसा नष्ट व्हावा व देशात कायदा, सुव्यवस्था राखली जावी व सरकारवर लोकांचा विश्वास वाढवा या दृष्टीने टाकलेले एक पाउल आहे. असे उद्गार डॉ. विनायक गोविलकर यांनी काढले. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अर्थात गोशिमा आणि एनकेजीएसबी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थ क्षेत्रातील उच्चशिक्षित व्यासंगी डॉ.विनायकराव गोविलकर यांचे नोटाबंदी-उद्दिष्ट आणि परिणाम या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत होते.
काळा पैसा नष्ट करण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्या पद्धतीने नोटबंदी करून नवीन नोटा बाजारात आणल्या त्या दृष्टीने निश्चितच काळा पैसा जमा करणार्यांच्यावर अंकुश बसेल. नागरिकांना आधार कार्ड सारख्या खात्यातून लिंक करून बँकेत खाते उघडायला लावले. त्याचाच वापर करून त्यांच्या खात्यात पैसा जमा होणार हे लक्षात घेवूनच बँकेतून पैसे काढणे आणि भरणे यावर निर्बंध लादले गेले आहेत. काळा पैसा ज्या ठिकाणी खर्च केला जातो किंव्हा ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केला जातो तसेच सर्व आरटीओ ऑफिसमध्ये नोंद होणाऱ्या वाहनांच्या नोंदी, तसेच इतर सर्व महत्त्वाचे ठिकाणी सरकारने लिंक केली आहेत याद्वारे एखाद्या व्यक्ती काळा पैसा बाहेर काढून कुठेही गेली तरी सर्व ठिकाणी सरकारची नजर असेल अश्या पद्धतीची सिस्टीम सरकारने राबवण्यास सुरुवात केली आहे.
ज्यां लोकांनी सर्वसामान्य लोकांच्या खात्यावर अडीच हजार व त्यापेक्षा जास्त रक्कम भरली आहे त्या सर्व लोकांना नोटीसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. सर्व पैसा कोठून आला याची सर्व करणे सरकारला द्यावी लागणार आहेत. त्यामुळे काळा पैसा जवळ बाळगणारे आता अडचणीत येण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांनी २५ लाखाच्यावर गाडी खरेदी केली आहे तसेच ज्या व्यक्तींच्या नावे खरेदी केली आहे त्यांची सुद्धा चौकशी होण्यास सुरुवात झाली आहे. एकूणच अशा गोष्टी मुळे कर भरणे प्रमाण वाढले आहे. रियल इस्टेट व सोने खरेदी या गोष्ठीचे दरहि आटोक्यात आलेले आहेत. याचा फायदा सर्व सामान्य लोकांना मिळणार आहे. कर्ज टक्केवारी कमी झाल्याने कमी व्याजात लोकांना कर्ज मिळणे सोयीचे झाले आहे.
शेतकऱ्यांची कर्ज माफी न करता येत्या बजेट मध्ये शेतीला पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक खेड्यात एक तळे, विहिरी तसेच इरिगेशन असे प्रकल्पासाठी बजेट मंजूर केले आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल. प्रत्येक गावोगावी रस्ते यासाठी देखील मोठे बजेट मंजूर केले आहे जेणेकरून शेजारच्या गावी जावून शेतकऱ्याला आपला माल विकून जास्त हमीभाव घेता येईल व शेतकऱ्यांची प्रश्न कायमचा सुटेल या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला आहे या पद्धतीने काळा पैसा बाहेर येयून लोकांच्यात सरकारचा, सरकारी सिस्टीमचा व कायद्याचा धाक निर्माण होवून देश आणखी प्रगती पथावर जाईल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. नोटाबंदी, अर्थसंकल्प आणि कॅशलेस व्यवहार या सर्व विषयांवर डॉ.गोविलकर प्रश्नांचे निरसन निरसन केले. गोशिमा आणि एनकेजीएसबी बँकेचे अधिकारी, संग्राम पाटील,उद्योगपती चंद्रकांत जाधव, मोहन पंडितराव, ब्रांच मॅनेजर वैद्य, निखील मोगरे यांच्यासह संचालक,कर्मचारी यांच्यासह लोक मोठ्याप्रमाणत
Leave a Reply