प्रेम आणि ध्येय याची सांगड घालणारा ‘रांजण’ येत्या १७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

 

पुणे: किशोरवयीन मुलाची निरागस प्रेमकथा,जो मुलगा स्वप्नाळू आहे.तर मुलगी म्हणजेच कथेतील अभिनेत्री ध्येयवादी आहे.दोघांच्या स्वभावाची दोन टोके.आणि त्यांचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही वेगळा.पण हाच दृष्टीकोन त्यांच्या प्रेमाला आकर्षणापलीकडे नेऊन ठेवतो आणि हेच प्रेम मिळविण्यासाठी त्यांना जे अचाट कराव लागते आणि त्यातून घडणाऱ्या गमती-जमती,निरागसता आणि मिश्कीलता म्हणजेच ‘रांजण’ येत्या १७ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.रांजण हा एक पारंपारिक ठेवा आहे. त्यातील गुपित लोकांना थक्क करायला लावतील.असे निर्माते रविंद्र हरपळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.या चित्रपटात यश कुलकर्णी,गौरी कुलकर्णी,अनिल नगरकर,भारत गणेशपुरे,भाऊ कदम आणि विद्याधर जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.संगीत नरेंद्र भिडे यांचे,गीते वैभव जोशी तर गीतकार गणेश निगडे आहेत.चित्रपटातील गाणी प्रसिद्ध गायक अजय गोगावले,अवधूत गुप्ते,नंदेश उमप आणि आदर्श शिंदे यांनी गायलेली आहेत.
आयुष्यात अशक्य असे काहीच नाही असा संदेश देणारा श्री महागणपती एन्टरटेनमेंट प्रस्तुत रांजण हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास कथा,पटकथा लेखक आणि दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी पत्रकारांशी चित्रपटाबद्दल दिलखुलास गप्पा मारताना व्यक्त केला.पत्रकार परिषदेला सहनिर्माते सोनाली हरपळे,योगेश झेंडे,जयवंत काळे,मयूर ससाणे,सह दिग्दर्शक आमिरा शेख,निलेश भोसले,यांच्यासह संपूर्ण चित्रपटाची टीम उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!