
कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2015 करिता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बी.एल.ओ. यांचेमार्फत मतदारांना मतदान स्लीप वाटप करण्याच्या नियोजनाबाबत आज बी.एल.ओ. यांची शाहू स्मारक भवन येथे बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी उपायुक्त ज्ञानेशवर ढेरे यांनी कामकाजाची माहिती देवून दि.30 ऑक्टोंबर पर्यंत 100 टक्के मतदान स्लीप मतदारापर्यंत पोहचविणे, दुबार नांवे असलेले मतदार कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत यांची खातरजमा करणेच्या सुचना यावेळी बी.एल.ओ. यांना देणेत आल्या. या कामकाजासाठी 458 बी.एल.ओ. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीस गैरहजर असलेल्या 170 बी.एल.ओ. यांचेवर भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 कलम 32 नुसार निलंबनाची कारवाई का करु नये अशा नोटीसा बजावणेत येत आहेत. गैरहजर बी.एल.ओ. यांनी दि.23 ऑक्टोंबर 2015 पासून मतदान स्लीप वाटपाचे काम सुरु न केलेस त्यांचेवर निलंबनाची कारवाई ठेवणेत येणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे, सहाय्यक अभियंता एन.एस.पाटील, विजय वणकुद्रे, सुधाकर चल्लावाड व कर्मचारी उपस्थित होते
Leave a Reply