
मुंबई : राज्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आतापर्यंत एक लाख 20 हजार कामे पूर्ण करण्यात आली असून या कामांमुळे आगामी काळात राज्याच्या कृषि क्षेत्राच्या उत्पादनात निश्चितच वाढ होणार आहे, अशी माहिती देताना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (नरेगा) माध्यमातून लहान शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात यावी व सर्व जिल्ह्यांतील जल स्त्रोतांचे मॅपिंग करण्यात यावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. जलयुक्त शिवार अभियान या महत्त्वाकांक्षी योजनेच्या आढाव्यासाठी बैठक झाली. ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला. ते म्हणाले, हे अभियान राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. मुंबईत काल झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी जलयुक्त शिवार अभियानाची जाहीररित्या प्रशंसा केली होती. त्यामुळे हे अभियान अधिक यशस्वी करून देशासमोर राज्याचा आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत एक लाख 20 हजारे कामे पूर्ण झाली असून 35 हजार कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवार
Leave a Reply