
कोल्हापूर: कोल्हापुरातील स्वराज्य सामाजिक संस्थेच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.तसेच डॉ.केदार फाळके यांचे शिवचरित्रावर आधारित व्याख्यान बसंत बहार रोड, सायबा हॉटेल जवळ येथे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.डॉ.केदार फाळके यांनी देशभरात आजवर ५०० व्याख्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर दिलेली आहते.सांगलीचे डॉ.केदार फाळके यांनी ‘शिवाजी महाराजांचे प्रशासन व व्यवस्थापन’या विषयात पीएचडी घेतलेली आहे.अश्या या व्यासंगी आणि शिवचरित्र अभ्यासक डॉ.केदार फाळके यांचे ‘श्री शिवछत्रपती राजनीती’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.आणि तीन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
स्वराज्य सामाजिक संस्थेच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात.शिवजयंतीनिमित्त लहान मुलांसाठी विविध स्पर्धा,गरजू आणि अपंग व्यक्तींना मदत,आरोग्य शिबिरे,रक्तदान शिबिरे यासारखे उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून राबविले जातात.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर घोरपडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.पत्रकार परिषदेला युवराज शिंदे,उदय ओतारी,समीर मुल्लाणी,अजय शिंदे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply