
1कोल्हापूर: रग्गेडीयन आणि कोल्हापूर पोलीस यांच्यावतीने हाफ मॅरेथॉन स्पर्धा येत्या रविवारी १९ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे.पोलीस परेड ग्राउंड पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून भारतातून आणि परदेशातून आत्तापर्यंत या स्पर्धेत ३५०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते आणि यंदा 6 हजार स्पर्धक सहभागी होतील असे आकाश कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.२१/१०/५ या तीन गटात विभागली असून १८ ते ३५,३५ ते ५० आणि ५० ते ६५ आणि त्यावरील वयोगटात ही स्पर्धा होणार आहे.स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून याच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.अपंग व्यक्तींसाठीही एक वेगळा गट आहे.त्यातही नोंदणी होत आहे.आंतरराष्ट्रीय चीपचा वापर करून निकाल घोषित करण्यात आहे.स्पर्धेच्या पूर्वसंध्येला पोलीस अधिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे क्रीडा आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन होणार आहे असेही कोरगावकर म्हणाले.तसेच क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा रग्गेडीयन अवॉर्ड देऊन गौरव करण्यात येणार आहे.सकाळी ६ वाजता स्पर्धेस सुरुवात होणार आहे.स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी ३०० स्वयंसेवक असणार आहेत.स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी शाळा कॉलेज विद्यार्थी,कार्पोरेट कंपन्या यात सहभागी होणार आहेत.स्पर्धेचे प्रमुख आयोजक बुलफायटर(सोनवणे ग्रुप) तसेच फॉर्च्यून ग्रुप,कोरगावकर पंप,गोल्ड जिम यांचे सहकार्य लाभले आहे.अधिक महितीसाठी www.ruggedian.com या वेबसाईटवर किंवा ९६२३६८८८८६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रग्गेडीयन्स यांनी केले आहे.
Leave a Reply