
कोल्हापूर: निखळ प्रेम, श्रावणातल्या वाऱ्याचा मंद झुळुकेने स्पर्श केल्यानंतर मोहोरलेल्या गुलाबाच्या त्या नाजुक पाकळीची अनुभूती! प्रेमाची अनेक रूपं आजतागायत रुपेरीपडद्यावर साकारली गेली आहेत व पुढेही अवतरतील. अशीच एक बहारदार नवीकोरी प्रेमकथा येऊ घातली आहे ‘प्रेमाय नमः’ च्या रूपात. अनोख्या प्रेमाची अतिशय निराळी पण मोहक,उत्कट पण शीतल, तीव्र पण नाजूक आणि गंभीर पण मजेशीर अनुभूती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.अतिशय प्रेमाने आम्ही हा चित्रपट बनविलेला आहे.तरी प्रेक्षकांना हा नक्कीच आवडेल अशी माहिती प्रमुख भूमिकेत असलेले आणि कोल्हापूरचे सुपरस्टार देवेंद्र चौगुले यांनी पत्रकारांशी बोलतना दिली.
‘प्रेमाय नमः’. खरंतर हा चित्रपट म्हणजे उत्कट प्रेमभावना आणि आदर्शवादी संस्कार ह्यांच्या नाजूक कात्रीत सापडलेल्या एका तरुणाची संवेदनशील प्रेमकथा आहे. दिग्दर्शक जगदीश वठारकर यांनी कथा, पटकथा, संगीत, लोकेशन्स ई. मध्ये वेगळेपण आणण्याचा स्तुत्य प्रयत्न केलाय.तसेच त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील इतिहासात प्रथमच एक रोमँटिक गाणे खोल पाण्याखाली चित्रित केले आहे जो चित्रपटाचा महत्वाचा यू एस पी (USP) आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेमाय नमः हा मराठीतील एकमेव चित्रपट आहे, ज्याने हिंदीच्या धर्तीवर स्वतःचा भन्नाट असा ऑफशियल गेम लाँच केलाय. ह गेम प्ले स्टोर वर उपलब्ध आहे. उत्तम चोराडे प्रेमाय नमःचे निर्मिती प्रेझेंटर आहेत विजय शिंदे, जितेंद्र जोशी व महेश जोके यांनी कथा लिहिली आहे. के. शशिकांत चंद्रशेखर जनावडेंच्या गीतांवर स्वरसाज चढवलाय संगीतकार के. संदीपकुमार चंद्रशेखर जनावडे यांनी तर या चित्रपटात देवेंद्र चौगुले आणि रुपाली कृष्णराव ह्या प्रमुख जोडीबरोबर प्राची लालगे, सुरेखा कुडची, प्रकाश धोत्रे, भरत दैनी, सायली मगदूम, स्नेहालराज यांनी अभिनयाची धुरा सांभाळली आहे.चित्रपटच शुटींग हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटी येथे झाले असून तेलगु फिल्म्सन हा चित्रपट टक्कर देईल असा विश्वास संपूर्ण चित्रपटाच्या टिमने व्यक्त केला.
Leave a Reply