
कोल्हापूर: कोल्हापूरचे लाडके माजी आरोग्यमंत्री आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय म्हणजेच सीपीआरचे भाग्य विधाते कै.दिग्विजय खानविलकर यांची जयंतीनिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले.नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
तसेच कै.दिग्विजय खानविलकर यांच्या जयंतीनिमित्त खुल्या जलतरण स्पर्धा शाहू कॉलेज येथील सागर पाटील जलतरण तलाव येथे पार पडल्या.विजेत्यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.यावेळी कै.दिग्विजय खानविलकर फौंडेशनचे अध्यक्ष विश्वविजय खानविलकर,श्रीमती राजलक्ष्मी खानविलकर,सौ.मधुरिमाराजे छत्रपती,नगरसेवक सत्यजित कदम,सुमित्रा खानविलकर,फौंडेशनचे पदाधिकारी,सदस्य,मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply