शिवरायांच्या आदर्श कारभाराचा धडा सध्याच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा: शिवचरित्र अभ्यासक डॉ.केदार फाळके

 

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांची औद्योगिक,शेतीविषयक आत्मियता,कर्जविषयक,जाल व्यवस्थापन,एकुणच रयतेविषयक धोरण आचरणात आणून कृती केली पाहिजे.यासाठी शिवचरित्राचा कित्ता गिरवला तरच देशात उद्योजकता येईल.शिवरायांच्या आदर्श कारभाराचा धडा सध्याच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा, असे आवाहन शिवचरित्र अभ्यासक आणि व्याख्याते डॉ.केदार फाळके यांनी केले.स्वराज्य सामाजिक संस्थेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
डॉ.फाळके म्हणाले,शिवाजी महाराजांचे निष्कलंक चरित्र,अफाट धाडस,व्यावस्थापन,नियोजन आणि कर्तव्य या सर्वच गोष्टी राजकारण्यांनी अंगीकारल्या पाहिजेत.जनतेचा राजा,रयतेचा राजा असे शिवरायांना म्हणतात.त्याचाच आदर्श त्यांनी घेतला पाहिजे.असा टोलाही डॉ.फाळके यांनी लगावला.शिवाजी महाराज प्रजेचे रक्षणकर्ते होते.हेच त्यांनी आपले आद्यकर्तव्य मानले होते.काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून याकडे वाकड्या नजेरेने पहाल तर त्याचे डोळे काढीन असा म्हणणारा राज्यकर्ता निर्माण होण्याची गरज आहे.शेतकऱ्यांना जमीन,अवजारे,बैलजोडी,अन्नधान्य दिले जात होती.आणि धान्याच्या रूपातच कर्ज परत फेडली जात असत.सध्या स्वस्त धान्य दुकान बंड करून सरकार दारू निर्मिती करत आहे.सरकारचे कर्जविषयक धोरण शेतकऱ्यांचा जीव घेणारे आहे.कर्जबाजारी झाल्याने शेतकरी आत्महत्या करतो.हे थांबायचे असेल तर शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण अमलात आणण्याची गरज आहे.जाणता राजा एकदा बोलला की त्यावर कोणी लगेच टीका किंवा टिप्पणी करत नसे.पण आत्ता एखादा नेता काही बोलला की लगेच दुसऱ्या बाजूला टीका होते.यातच जनतेचा त्यांना विसर पडतो.हा विरोधाभास आहे.यात बदल व्हायला हवा.
रायगड,पन्हाळासह सर्वच गडकिल्ले यावर शिवाजी महाराजांनी केलेल्या पाणी व्यवस्थापनाचा अभ्यास करून पाणी व्यवस्थापन केले.तर दुष्काळावर सहज मात करता येईल.शिवरायांचे पाणी व्यवस्थापन लवकरच अमलात आणले नाही तर आपल्या देशाचे वळवंट झाल्याशिवाय राहणार नाही असा धोकदायक इशाराही डॉ.फाळके यांनी दिला.भविष्य निर्वाह निधी म्हणून त्याकाळी शिवाजी महाराजांनी मोठी तरतूद करून ठेवली होती.सध्याचे राजकारणी आणि सत्ताधीश नुसतेच मोठ्या गप्पा मारतात,जनतेसाठी काही करण्यासारखे यांच्याकडे काहीच नसते.अशी कडाडून टीकाही त्यांनी केली.शिवमुद्रेचा अर्थदेखील अजून लोकांना नीट समजलेला नाही अशी खंतही व्यक्त केली.शेवटी दिल्ली जिंकण्याचे ध्येय मराठ्यांनी ठेवले पाहिजे,यासाठी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.मराठे आपल्याला दिल्लीवर राज्य करायचे हे विसरलेत असेही डॉ.फाळके यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमानंतर लहान मुलांसाठी फन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या.स्वराज्य सामाजिक संस्थेची कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष सागर घोरपडे यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे उद्घाटन नगर भूमापन अधिकारी सुवर्णा पाटील,रत्नागिरीचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त स्वप्नील नायकवडी,सहकार अधिकारी दिपाली चौगुले यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमास युवराज शिंदे,उदय ओतारी,समीर मुल्लाणी,अजय शिंदे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी,सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!