जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल घोषित

 

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या 67 गटांसाठी तर पंचायत समित्यांच्या 134 गणांसाठीचा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज संबंधित तालुक्यांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला. ही मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पडली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या 67 गटांपैकी भारतीय जनता पार्टीला 14 , भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 14, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 11, शिवसेनेला 10, अमान्यता प्राप्त तथापी राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत पक्ष/आघाडी-17 आणि अपक्ष-1 अशा जागा मिळाल्या आहेत

.पंचायत समितीच्या 134 गणांपैकी भारतीय जनता पार्टीला 15, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 24 , शिवसेनेला 22, अमान्यता प्राप्त तथापी राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत पक्ष/आघाडी 39 आणि अपक्ष-3 अशा जागा मिळाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!