कोल्हापूर: गेली अनेक वर्षे प्रलंबीत असणारा मल:निस्सारनाच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्राच्या भाजपा शासीत सरकारने आज दि.२३.०२.२०१७ रोजी रु.७२ कोटी कोल्हापूर महानगरपालिकेकडे वर्ग केले.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील तसेच कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडीक यांनी हा प्रकल्प मंजूर व्हावा म्हणून विशेष प्रयत्न केल व त्यामुळेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकल्पाला अमृत योजनेतून ७२ कोटी रुपये मंजूर केले.
या योजने अंतर्गत प्रामुख्याने दुधाळी झोन अंतर्गत (रंकाळा, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, बीडी कामगार, राधानगरी रोड, देवकर पाणंद, राजलक्ष्मी नगर, तपोवन) ११२ किलोमीटरची ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुधाळी एस.टी.पी.शेजारी आणखी एक ६ MLD चा STP प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नाल्यावर फायटो प्रक्रिया करण्यासाठी देखीलही या निधीचा वापर करण्यात येणार आहे.
गेली कित्येक वर्ष या सर्व नाल्यातील मैला मिश्रीत पाणी पंचगंगा नदीला थेट जाऊन मिळत होते व त्यामुळेच पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषीत होत होती. या प्रदुषीत पाण्यामुळे साथीचे आजार नदीकाठच्या गावांमध्ये वारंवार उद्भभवत होते. ह्या सर्व बाबींवर योग्य उत्तर म्हणजे प्रदुषीत पाण्यावर प्रक्रिया करणे व त्यातील अशुद्ध घटक बाजूला करणे होय.
या पत्रकाद्वारे मी संदीप देसाई (जिल्हाध्यक्ष भाजपा) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाम.देवेंद्रजी फडणवीस, कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडीक यांचे भाजपा कोल्हापूरच्या वतीने विशेष अभिनंदन व जाहीर आभार मानत आहे.
Leave a Reply