धर्म देशाचा आत्मा आहे: प.पू आचार्य लोकेश मुनीजी

 

कोल्हापूर : धर्म हा देशाचा आत्मा आहे.यात कोणतीही राजनीती अणु नये.देशाची व्यवस्था चालविणारे हात पवित्र असले पाहिजेत.यासाठी चांगल्या काम करणाऱ्या व्यक्ती निर्माण व्यायला हवी यावर भर दिला पाहिजे जीवन जगताना समाजासाठी कार्य करणे असे उद्देश्पूर्ण जीवन असयला हवे.अंधाराने आपल्यावर मात करण्यापेक्षा चांगल्याचा विजय करण्यासाठी आपण आपले जीवन व्यथित केले पाहिजे.आपला देश पंथ,संप्रदाय,आणि मजहब निरपेक्ष असला पाहिजे.कारण सांप्रदायिक कहरता अनेक समस्या निर्माण करतात.धर्म आणि संप्रदाय या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.पण मानवता हाच खरा धर्म असला पाहिजे.असे प.पु.आचार्य लोकेश मुनीजी यांनी संदेश दिला. वुई केअर या एनजीओ कॅम्पशन २४ यूथ अनेक्स यांच्या वतीने आज कोल्हापुरात युनायटेड नेशन्स पीसचे अॅम्बासिडर आचार्य लोकेश मुनीजी आले होते.त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. आतापर्यंत युनायटेड नेशन्सच्या वतीने जगभरात लेक वाचवा अभियान,महिलांवर होणारे अत्याचार,ड्रग आणि नशेच्या विरोधात अभियान,तरुणांच्या समस्या,प्रदूषण यावर तरुणांना मार्गदर्शन केले आहे.त्यांच्यात जागृती केली आहे.आज वुई केअरच्या निमित्ताने कोल्हापुरकारांना हे मार्गदर्शन मिळाले.पत्रकार परिषदेला खासदार धनजंय महाडिक,आमदार डॉ.सुजित मिनचेकर,वक्ते साजन शहा,मिलिंद धोंड यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,युवक,युवती,पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!