कोल्हापूरचे वैद्यकीय क्षेत्र पुन्हा एकदा अधोरेखित;पत्की हॉस्पिटल,डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज यांच्या जुळ्या मुलांच्या हस्तठश्यांवरील संशोधनास राष्ट्रीय मान्यता

 

कोल्हापूर: कोल्हापुरातील स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्र क्षेत्रामध्ये अंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित असलेल्या पत्की हॉस्पिटल रिसर्च फौंडेशन आणि डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज शरीरशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या हुबेहूब सारख्या दिसणाऱ्या जुळ्या मुलांचा तुलनात्मक हस्तठसे म्हणजेच फिंगरप्रिंट्स यावरील संशोधनाची राष्ट्रीय स्तरावर दाखल घेण्यात आली आहे.२०१४ साली या संशोधनास सुरुवात झाली.पण गेल्या 2 वर्षात सातत्याने केलेले हे संशोधन ‘नॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल अॅनॉटॉमी’ या नियतकालीकामधून एप्रिल २०१७ मध्ये प्रसिद्ध होणार आहे.अश्या संशोधनास मान्यता मिळणे ही देशातील पहिलीच घटना आहे अशी माहिती डॉ.सतीश पत्की यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.यामुळे कोल्हापूरचे वैद्यकीय क्षेत्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.पत्की हॉस्पिटल आणि डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज,शरीर शास्त्र विभाग मधील डॉ अनिता गुणे,डॉ.आनंद पोटे यांच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाले असेही डॉ.पत्की म्हणाले.
एकाच हॉस्पिटलमध्ये जन्म झालेल्या हुबेहूब म्हणजेच आयडेटीकल जुळी यांच्या हस्तठश्यांवरील देशातील हे पहिले संशोधन ज्याला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.यांच्यात जरी जनुकीय साम्य असले तरी त्यांच्या ठश्यांमध्ये फक्त ४५ टक्के साम्य असते.बायोमेट्रिक प्रणालीत व्यक्ती ओळख करण्यात फसगत होणार नाही असा निष्कर्ष या संशोधनावरून निघतो.हे संशोधन संपूर्ण वैद्यकीय शास्त्रावर आधारित आहे.अश्या व्यक्तींचे ठसे घेताना फक्त अंगठा किंवा एका बोटाचे ठसे घेऊन चालणार नसून आधार कार्ड प्रमाणे सर्व तळ हाताचे ठसे घेणे आवश्यक आहे असेही यात आढळून आले.दोन्ही जुळ्यापैकी कमी वजनाच्या मुलांमध्ये हस्त रेषा जास्त असतात हे ही निदर्शनास आले आहे.यामुळे बायोमेट्रिक आणि सरकारी धोरण यांच्यासाठी हे संशोधन अतिशय महत्वाचे ठरू शकते. हुबेहूब दिसणारी आज अशी अनेक जुळी मुले कार्यक्रमात हजार होती.त्यांच्या पालकवर्गाने आज डॉ.पत्की दांपत्याचे अभिनंदन केले.आतापर्यंत जवळजवळ ५७३ जुळी आणि ८ तिळी यांचा जन्म डॉ.पत्की यांच्या हॉस्पिटल मध्ये झाला आहे.जुळ्यामधेही हुबेहूब म्हणजे आयडेंटिकल जुळी यांचे प्रमाण ३५ टक्के असते.असेही डॉ.पत्की यांनी सांगितले.यावेळी सर्व जुळी मुले,पालक,डॉ.आनंद पोटे,डॉ.अनिता गुणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!