
कोल्हापूर: मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या विविध संगीताची क्रेझ बघायला मिळत आहे.ठेका धरायला लावणार एखादे भन्नाट गाणे आल की संगीत प्रेमी ते नक्कीच डोक्यावर घेतात.अशाच रसिक प्रेक्षकांची आवड लक्ष्यात घेऊन व्हिडिओ पलेस या आघाडीच्या म्युझिक कंपनीने ‘मला लगीन करायचं’ हा व्हिडीओ अल्बम आणला आहे.येत्या 7 मार्च रोजी हा अल्बम प्रदर्शित होत आहे.याचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीत पहिल्यांदाच हिंदीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार जॉनी लिव्हर यांनी या अल्बममध्ये महत्वाची भूमिका केली तर आहेच पण यात रंप गायला आहे.याचे अजून एक वैशिष्ठ म्हणजे मराठीतील आघाडीची नायिका,आणि डान्सिंग क़्विन मानसी नाईक हिने आपल्या अदाकारीने या अल्बमला चार चांद लावलेत असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.डीआयडी फेम सिद्धेश याने दिग्दर्शन,निर्मिती,कोरिओग्राफी आणि पुन्हा मुख्य भूमिका अश्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत.
जॉनी लिव्हर यांच्यासोबत काम करणे ही भाग्यची गोष्ट होती.ते खूप मोठे कलाकर आहेत.लग्न हा सर्व तरुण आणि तरुणींचा जिव्हाळ्याचा विषय आहे.या संदर्भात विनोदी पण संदेश देणारे हे गाणे आहे.याचे शुटींग करताना अगदी बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास केला आहे.वेस्टर्न आणि फ्युजनचा अनोखा मिलाफ या संगीतात लोकांना ऐकायला मिळेल.अश्या भवना मानसी नाईकहिने स्पीड न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या. या अल्बमच्या प्रमोशनसाठी आज संपूर्ण टीम कोल्हापुरात आली होती.त्या दरम्यान मानसीने दिलखुलास गप्पा मारल्या. याचे कॉस्च्युम डिझाईन मानसी नाईक हिनेच अगदी अनोख्या पद्धतीने केले आहे.व्हिडीओ पलेस प्रस्तुत मानसी,जॉनी,आणि सिद्धेश यांची अफलातून केमिस्ट्री असणारा ‘मला लगीन करायचं’ हा म्युझिक अल्बम येत्या लग्नसराईत नक्कीच ठेका धरायला लावेल असा विश्वास अल्बमच्या टिमने व्यक्त केला.
Leave a Reply