केरळमधील कम्युनिस्ट सरकारने केलेल्या हिंदुंवरील हल्ल्याच्या विरोधात प्रबोधन मंचचे जन आक्रोश आंदोलन

 

कोल्हापूर: गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक केरलमध्ये समाज संघटनेचे काम करत आहेत.पण तिथे कम्युनिस्ट सरकारच्या संरक्षणाखाली राष्ट्रभक्त आणि स्वयंसेवक यांच्यावर खुनी हल्ले होत आहेत.पुरोगामीपणाचा आव आणणाऱ्या केरळ राज्यात मार्क्सवाद आणि कम्युनिझम हा हिंसक आणि अमानवी आहे.१८ जानेवारी २०१७ रोजी संतोष कुमार या ५२ वर्षीय ज्येष्ठ स्वयंसेवकाच्या झोपडीवर कम्युनिस्ट गुंडांनी हल्ला केला.आणि धारदार शस्त्राने हत्या केली.तो केवळ आरएसएसचा कार्यकर्ता असल्याने हे दुष्कृत्य करण्यात आले आहे.अशी दाहक भावना आज कोल्हापुरात मिरजकर तिकटी येथे झालेल्या प्रबोधन मंचच्या जन आक्रोश आंदोलनात व्यक्त करण्यात आल्या.भाजप पंचायत समिती अध्यक्ष निवृत्त पोलीस उपनिरीक्षक रविंद्रन यांच्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गुंडांनी हल्ला केला होता.त्यात त्यांचा मृत्यू झाला.लहान मुले,ज्येष्ठ नागरिक,महिला यांनाही आता या गुंडांनी लक्ष केले आहे.आजवर शेकडो लोकांच्या हत्या या डाव्या आघाडीच्या गुंडांनी केल्या आहेत.असे मात आज मान्यवरांनी व्यक्त केले.जेणेकरून केरळमध्ये यांना दहशत माजविता येईल.पण आजवर कुणावरही कारवाई झालेली नाही.यामुळे केरळ सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी,दोषींवर कठोर कारवाई करावी,हत्या झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना नुकसानभरपाई द्यावी,व्यक्तीचे विचार आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवावे अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी जिल्हा संघसंचालक भगतरामजी छाबडा,प्रतापसिंह दड्डीकर,सूर्यकिरण वाघ,भाजप अध्यक्ष संदीप देसाई, उपाध्यक्ष हेमंत आराध्ये,सुभाष वोरा,नगरसेवक विजय पाटील,संतोष गायकवाड,सविता भालकर,जयश्री जाधव,विजय सूर्यवंशी,अजित ठाणेकर माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव,बजरंग दलाचे महेश उरसाल,बंडा साळोखे,विश्व हिंदू परिषदेचे श्रीकांत पोतनीस यांच्यासह विविध संघटना,संस्था यांचे प्रतिनिधी,सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!