कोल्हापुरची ऋचा पुजारी बनली महिला आंतरराष्ट्रीय मास्टर

 

कोल्हापूर   – आंतराराष्ट्रीय बुद्धीबळ पटूंवर मात करत कोल्हापुरची सुपीत्री ऋचा पुजारी हिने रशियातील मॉस्को येथे झालेल्या आंतराराष्ट्रीय स्पर्धेत यश पटकावले आणि ती महिला आंतरराष्ट्रीय मास्टर बनली. अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी ही स्पर्धा होय. मॉस्को येथे संपन्न झालेल्या एरोफ्लोट खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत तिने हे दैदिप्यमान कामागिरी केली. ऋचा पुजारी हीला या स्पर्धैत खेळण्याची संधी मिळाली आणि याच संधीचे तिने सोन केले. या कामगिरीमध्ये तिने तिच्यापेक्षा कितीतरी जास्त गुणांकन असणाऱ्या खेळांडूवर मात केली किंवा बरोबरी ही साधली. ऋचा पुजारीच्या या कामागिरीमुळे तिने घसघशीत 46गुणांची कमाई केलीच पण तिने गेली चार वर्षे हुलकावणी देणारा महिला आंतरराष्ट्रीय मास्टरचा तिसरा व शेवटचा नॉर्म मिळवला. या विजयामुळे आता तिला जागतिक बुद्धीबळ महासंघाकडून अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा महिला आंतरराष्ट्रीय मास्टर हा किताब मिळणार आहे.  ऋचा पुजारीने आत्तापर्यंत केलेल्या कामागिरीवर तिला 2006 साली जागतिक बुद्धीबळ महासंघाकडून महिला फीड मास्टर हा किताब मिळाला होता. आता तिला मिळणारा हा महिला आंतरराष्ट्रीय मास्टर (WIM) हा तिच्या करिअरमधील पुढील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या किताबपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत अवघड स्पर्धेत तिने कौश्यल्याने मात केली. आपल्यापेक्षा जास्त गुणांकन असणाऱ्या खेळांडूवर मात करून ठराविक गुणांचा टप्पा पार करून तिने तीन नामांकने मिळावावी लागतात आणि तिने ते करून दाखविले आहे. ऋचाने WIM चा तिचा पहिला नॉर्म 2011 साली फिलीपाईन्सला,दुसरा नॉर्म 2012 साली ताश्कंद ला पूर्ण केला होता. तिसऱ्या व शेवट्या नॉर्मने तिला चार वर्षे हुलवकावणी दिली. र्मजवळ जावून तो निसटत होता. परंतू काल मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत तिने नैसर्गिक आक्रमक खेळ करीत तिसरा नॉर्म पटकावला.ऋचाला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, कोल्हापूर जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष विश्वविजय खानविलकर यांचे सहकार्य व प्रोत्साहान मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!