भाजपा जिल्हा परिषद पक्ष प्रतोदपदी विजय भोजे यांची निवड

 

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तसेच पं.स. सदस्य यांचा सत्कार व पक्ष प्रतोद निवडीचा कार्यक्रम हॉटेल पॅव्हेलियन येथे पार पडला अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष मा.हिंदुराव शेळके होते.
यावेळी बोलताना भाजपा नेते आम.सुरेश हळवणकर यांनी केंद्रातील भाजपा सरकार तसेच राज्यातील.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे भाजपा सरकार विकासाचा मुद्द घेऊन सर्व क्षेत्रात काम करीत आहे आपल्या जिल्ह्यात भाजपा नेते पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा महापूर कोल्हापुरात आणला आहे. निवडून आलेल्या सर्व भाजपाच्या सदस्यांनी आपला विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून काम करावे असे आवाहन केले.
जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी भाजपाच्या १४ जि.प सदस्यांना पक्ष प्रतोद एकमताने निवडण्याचे आवाहन केले असता जेष्ठ जि.प. सदस्य.अरुणराव इंगवले यांनी अब्दुल लाट मधून जि.प सदस्य म्हणून निवडून आलेले विजय भोजे यांचे नांव सुचवले त्यास सौ.विजया पाटील यांनी अनुमोदन दिले.
तसेच ताराराणी आघाडीच्या सदस्यांची स्वतंत्र बैठक होऊन सौ सुनीता रेडेकर यांची ताराराणी आघाडीच्या पक्ष प्रतोद म्हणून निवड झाली.
पंचायत समित्यांच्या पक्ष प्रतोदसाठी करवीर पं.स  रमेश चौगले (दिंडनेर्ली पं.स) हातकणंगले पं.स  उत्तम सावंत (नागांव पं.स) गडहिंग्लज पं.स  विठ्ठ्ल पाटील (कडगांव पं.स) गगनबावडा पं.स आनंदा पाटील (धुंदवडे पं.स) शिरोळ पं.स सौ योगिता कांबळे (शिरोळ पं.स) भुदरगड पं.स सौ आक्काताई नलवडे (आकुर्डे पं.स)
यावेळी आम.अमल महाडीक, बाबा देसाई यांनी मार्गदर्शन केले. मा.अरुणराव इंगवले यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!