
कोल्हापूर: कोल्हापूरच्या डॉ.सौ.सफिया मोमीन यांना नेपाळ येथे झालेल्या इंडो-नेपाळ फ्रेन्डशिप अंड इकोनॉमिक ग्रोथ सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडून प्राईड ऑफ एशिया इंटरनॅशनल अवार्ड प्रदान करण्यात आला.डॉ.मोमीन यांना त्यांनी केलेल्या त्यांच्या ३७ वर्षाच्या शासकीय परिचर्या सेवा व शिक्षण या क्षेत्रातील सेवेबद्दल त्यांनी लिहलेल्या परिचर्या,पॅरामेडिकल,डाएटीशियन,फिजीओथेरपीस्ट अश्या अनेक विषयावरील पुस्तकांसाठी दिला गेला.त्यांनी लिहलेली ही पुस्तके महाराष्ट्रातील सर्व नर्सिंग कॉलेजमध्ये क्रमिक पुस्तकांप्रमाणे अभ्यासली जातात.परीचार्यः शास्त्र,तंत्र,कला हे मराठी भाषेतील त्यांचे पुस्तक १९८२ साली प्रकाशित झाले आणि त्याच्या एकूण २४ आवृत्या निघाल्या आहेत.मिनी मेडिकल ज्ञानकोशाचे माहिती संकलन व संशोधनपर त्यांचे कार्य सुरु आहे.डॉ.मोमीन यांनी आजवर २१ पुस्तके लिहलेली आहेत.
नेपाळचे कॅबिनेट मंत्री शंकर भंडारी आणि भारताचे पूर्व सीबीआय डायरेक्टर डॉ.व्ही.एन.सेहगल यांच्या हस्ते नेपाळ येथील काठमांडू येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आले.कोल्हापूरच्या डॉ.सफिया मोमीन यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे कोल्हापूरचे नाव जगात उंचावले आहे.आई-वडील,सासू-सासरे यांच्या नावे त्यांनी नर्सिंग विषयात प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्याना विशेष बक्षीस दिले जाते.त्यांच्या या कार्यामुळे वैद्यकीय विश्वाचा गौरव झाला आहे.
Leave a Reply