
कोल्हापूर: कामकाजात “शून्य प्रहर” सह विविध मार्गांनी गतवर्षात सर्वाधिक ७०४ प्रश्न विचारून देशात सर्वप्रथम म्हणजेच टोप वन होण्याचा बहुमान राष्ट्रवादीचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी मिळविला आहे.प्रथमच दिल्लीमध्ये जावून तिसऱ्याच वर्षी हा बहुमान मिळविण्यासाठी वेळोवेळी माहिती निवेदने देणारे विविध संघटना त्यांचे कार्यकर्ते,विचारमंच,निवृत्त प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सर्व सहकारी पदाधिकारी यांचे खासदार महाडिक यांनी विशेष आभार मानले.या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे प्रश्न संसदेत मांडणे गरजेचे होते.यासाठी मला यांची मदत झाली असेही खासदार महाडिक प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
खासदारकीच्या पहिल्या वर्षी टोप टेन मध्ये, दुसऱ्या वर्षी टोप थ्री मध्ये आणि आता तिसऱ्या वर्षी टोप वन म्हणजेच सर्वप्रथम येऊन महाराष्ट्राचा एकतर्फी बहुमान झाल्याचे सांगत यासाठी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सहकारी खासदार सुप्रियाताई सुळे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.व्यापक जनसंपर्क,निरीक्षण,व्यक्तिगत अभ्यास,यामुळेच देशात सर्वप्रथम येण्याचा मान मिळाला आहे.आता माझी जबाबदारी वाढली आहे असेही ते म्हणाले.
खासदार झाल्यानंतर आता संपूर्ण भारतात टोप वन आल्यामुळे मला त्यांचा अभिमान वाटतो अश्या भावना सौ.अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केल्या.सत्ता नसतानाही त्यांनी लोकांसाठी कार्य केले.आणि आता लोकांमुळेच हा मान मिळाला आहे.त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी महापौर सुनील कदम,नगरसेवक सत्यजित कदम,उत्तम शेटके,मिलिंद धोंड यांच्यासह मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply