
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीदरम्यान नाट्यप्रयोग सादर करत असतानाच कोल्हापूरच्या सागर चौगुले या हौशी कलाकाराचा रंगमंचावरच हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. त्यामुळे विशेष पुरस्कार प्रदान करून कै.सागर चौगुले याच्या पश्च्यात असणाऱ्या कुटुंबियांना आर्थिक विवंचनेतून दिलासा देऊ, अशी माहिती सांस्कुतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. कै. सागर चौगुले घटक असलेल्या हृदयस्पर्श व्यासपीठाच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट भेटली. यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी तातडीने सांस्कुतिक कार्य मंत्री ना. विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती देऊन पश्च्यात कुटुंबियांच्या परिस्थितीची दाहकता मांडली व शासनाच्यावतीने आर्थिक मदत देण्यासाठी विनंती केली.
यावर सांस्कुतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी तातडीने त्यांच्या सचिवांना सुचना देऊन आर्थिक मदतीकारीताची कार्यवाही तत्परतेने करण्याच्या सुचना दिल्या. दरम्यान मा. मुख्यमंत्री सहयत्ता निधीतूनही सागर चौगुले यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याकरिता मागणी पत्र आमदार राजेश क्षीरसागर मुख्यमंत्री महोदयांना प्रत्यक्ष भेटून सादर करणार आहेत.
Leave a Reply