कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द.ना. धनागरे यांच्या निधनामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा थोर समाजशास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. धनागरे समाजशास्त्र, लोकप्रशासन आणि शेतकरी चळवळ या विषयांचे गाढे अभ्यासक होते. या विषयांवरील त्यांचा अधिकार वादातीत होता. डॉ. धनागरे स्पष्टवक्ता स्वभावाचे होते. हजरजबाबी नर्मविनोद हेही त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे एक वैशिष्ट्य होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून विद्यापीठाच्या विकासात त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे.
Leave a Reply