
कोल्हापूर : आज जागतिक महिला दिनाच्या निमित्याने भाजपा महिला आघाडीच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे प्रसूती विभागात महिलांना महिला आघाडी अध्यक्षा सौ वैशाली पसारे यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. प्रसूती विभाग प्रमुख डॉ.शिरीष शानभाग, सचिव आनंदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला रुग्णांना फळे वाटप करण्यात आली, याप्रसंगी ८ मार्च महिला दिनाचे महत्व सांगून महिलांनी आपले हक्क व कर्तव्याची जाणीव ठेवून स्वत: सक्षम बनावे असे प्रतिपादन महिला आघाडी अध्यक्षा सौ वैशाली पसारे यांनी उपस्थित महिलांसमोर केले.
यावेळी सौ प्रभा इनामदार, सौ भारती जोशी, सौ किशोरी स्वामी, सौ सुलभा मुजुमदार, सौ कविता पाटील, सौ रेखा वालावलकर, सौ शोभा भोसले, सौ सुनीता सूर्यवंशी, सौ रजनी भूर्के, शोभा कोळी, आकुताई जाधव, शारदा पाटील व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
Leave a Reply