
कोल्हापूर:- जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क, रमणमळा येथे मुक्तांगिणी हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
प्रारंभी महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते मातीच्या कुंडीमध्ये वृक्षारोपण करुन या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविकामध्ये महिला बालकल्याण समिती सभापती सौ.वहिदा सौदागर यांनी घरसंसाराचा गाडा चालवत चरितार्थासाठी/समाजकारणासाठी कार्यरत असणाऱ्या स्त्रियांच्या कार्याला मानवंदना देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या ताणतणावातून मुक्त वातावरणात एकत्र येवून त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलेचे सांगितले.
महापौर सौ.हसिना फरास यांनी बोलताना शहराची लोकसंख्या विचारत घेतली तर यामध्ये 50 टक्के महिला आहेत. याकरीता महिलांच्यासाठी विविध माध्यमातून काम करणे हे महानगरपालिकेचे आज कर्तव्य बनले आहे. भारतीय परंपरेत स्त्रीयांना मातेच्या रुपात फार महत्व आहे. तसेच देशाला देखील भारत मातेचा देश म्हणून पाहत आहोत. जिजाऊमुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे सारखे राजे लाभले. रयतेचे राज्य निर्माण करणेसाठी त्याच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांचा मोठा हात होता त्यामुळेच त्यांना कोणतीच अडचण आली नाही. छत्रपती शिवरायांनी व राजर्षि शाहू महाराजांनी राज्यामध्ये स्त्रियांना चांगला आदर देवून जो सन्मान दिला त्यांची हि शिकवण आज आपण आचारणात आणणे ही काळाची गरज आहे. हा उदात्त हेतू डोळयासमोर ठेवून कार्यरत राहिल्यास स्त्रियांना कोठेच अडचण निर्माण होणार नाही. शासनाने स्त्रीयांसाठी राखीव जागा आरक्षीत केलेल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा. आजही असंख्य महिला ज्या शिक्षण, रोजगार या पासून वंचीत आहेत त्यांना शिक्षण मिळावे व त्या स्वावलंबी होऊन समाजामध्ये ताठ मानेने उभ्या राहाव्यात अशी माझी इच्छा आहे. समाजामध्ये होणारे अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या याबाबत समाज प्रबोधनाची गरज आहे. यासाठीही आपण सर्व स्त्रीयांनी एकत्रीतपणे कार्य करणेची गरज आहे. सर्व समाजातील स्त्रीयांनीदेखील स्वकर्तृत्वावर उभे राहून आपण देखील कमी नाही याची जाणीव घेऊन पुढे राहिल्यास स्त्रीयांवर असणारा समाजातील पुरुषप्रधान प्रभाव कमी होणेस मदत होणार आहे असे सांगितले
Leave a Reply