
कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने २००७ सालापासून बंद झालेल्या महापौर फुटबॉल चषक स्पर्धांना पुन्हा यावर्षीपासून सुरुवात होत आहे. यंदा या स्पर्धा दि.१४ मार्च ते २६ मार्च २०१७ या कालावधीत भरविली जाणार आहे.या स्पर्धेमध्ये शहर हद्दीतील १६ नामांकित संघाचा सहभाग असणार आहे.विजयी संघास रु.१ लाख व चषक, उपविजेत्या संघास ५० हजार व चषक असे बक्षिसाचे स्वरूप असणार आहे.याशिवाय उत्कृष्ट गोलकीपर, उत्कृष्ट डीफेंस, उत्कृष्ट हाफ, उत्कृष्ट फॉरवर्ड खेळाडूस प्रत्येक ५ हजार व चषक व संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूस रु.१० हजार व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. पहिले चार दिवस दुपारी २ ते ४ असे रोज दोन सामने होतील.पुढील सात दिवस दुपारी ४ वाजता प्रत्येकी एक सामना खेळविला जाईल.अशी माहिती महापौर सौ.हसीना फरास यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
स्पर्धेला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी सर्वोतोपरी काळजी घेतल्याचे स्पर्धेचे संयोजक आचारसंहिता अंमलबजावणी प्रमुख माजी नगरसेवक आदिल फरास यांनी सांगितले.यासाठी सुरक्षिततेसाठी महापालिका अग्निशामक विभाग विभागाचे कर्मचारी, प्रथमोपचार व्यवस्थेसाठी महापालिका आरोग्य विभाग,रुग्णवाहिका,डॉक्टर तैनात असणार आहेत.तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.
महापौर चषक स्पर्धा २०१६-१७ साठी समिती स्थापन करण्यात आली आहे.त्याच्या अध्यक्षा महापौर असून उपाध्यक्ष उप महापौर अर्जुन माने,सचिव स्थायी समिती सभापती संदीप नेजदार तर प्रमुख संयोजन समितीत परिवहन सभपती नियाज खान,सचिन पाटील,संभाजी जाधव,राहुल माने,तौफिक मुल्लाणी,विजय खाडे,संतोष गायकवाड,आचारसंहिता समितीत आदिल फरास,शारंगधर देशमुख,विजय सूर्यवंशी, प्रोटेस्ट कमिटीमध्ये सभागृह नेता प्रवीण केसरकर प्रमुख असणार आहेत.स्पर्धा शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे असे नियाज खान यांनी सांगितले.यावेळी नगरसेवक सत्यजित कदम,शारंगधर देशमुख,उप महापौर अर्जुन माने यांच्यासह नगरसेवक,महापलिका कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply