कोल्हापूर:पंचायत समिती सभापती निवडीमध्ये भारतीय जनता पक्षाने दोन्ही जागांवरती सभापती म्हणून महिलांना संधी देऊन खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाची कृती अमलात आणली आहे. गडहिंग्लज येथे ओ . बी. सी खुल्या गटातून सौ.जयश्री तेली यांना संधी दिली तर हातकणंगले मधून सौ. रेश्मा सनदी याना इतर मागासवर्गीय महिला गटातून सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली. सौ. तेली व सौ.सनदी यांच्या रूपाने भाजपने आपल्या कडील दोन्ही जागांवर महिलांनाच संधी उपलब्ध करून दिली. दिल्ली ते गल्ली एकच सरकारचा नारा देत महिला सबलीकरणाची अंमलबजावणी या दोन ठिकाणी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली आहे.
Leave a Reply