
कोल्हापूर: श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ संचालित सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर मधील न्युरोसर्जरी विभागात मेंदू शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे नवीन अत्याधुनिक न्युरोमॉनीटर हे मशिन रुग्णांसाठी उपलब्ध झालेले आहे.पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिले मशिन येथे दाखल झाले आहे.अशी माहिती मठाचे मठाधिपती प.पु.काढसिद्धेश्वर महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
रुग्णाला भूल दिल्यानंतरही मेंदूची संपूर्ण माहिती या मशिनद्वारे डॉक्टरांना समजू शकते.तसेच शस्त्रक्रियेतील धोके यात समजू शकतात.अत्यंत गुंतागुंतीच्या आणि जोखीमेच्या शस्त्रक्रिया या मशिनद्वारे सहज केल्या जाऊ शकतात.या मशिनद्वारे मेंदूतील गाठी काढणे सुलभ होणार आहे.कान आणि घसा यातील ग्रंथी यांच्या शस्त्रक्रिया करणे सुलभ होणार आहे.एकूणच सिद्धगिरी हॉस्पिटलमधील न्युरो सर्जरी विभागाची गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी हे मशिन अत्यंत उपयुक्त आहे.न्यूरोसर्जरीसाठी हे हॉस्पिटल एकमेव आहे.मेंदूसंबंधित सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार येथे माफक दरात मिळतात.म्हणूनच या मशीनमुळे हा विभाग अजूनच अद्ययावत बनला आहे.यासाठी मुंबई,पुणे येथे जाण्याची गरज आता रुग्णांना भासत नाही.आतापर्यंत ५०० हून अधिक अवघड शस्त्रक्रिया इथे केल्या आहेत.असे डॉ.शिवशंकर मरजक्के म्हणाले.राजीव गांधी जीवनदायी योजना आणि कर्नाटक सरकारच्या सुवर्ण आरोग्य ट्रस्ट या अंतर्गत ४०० शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत.स्वामींच्या निराधारांना आधार या तत्वानुसार इथल्या तज्ञ डॉक्टर्स मुळे अनेकांना जगण्याचा आधार मिळालेला आहे.
Leave a Reply