कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील वाडीरत्नागिरी येथील महाराष्ट्रात तसेच देशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थान विकास योजनेसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजुरीवर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील, अर्थमंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबई येथे शिक्कामोर्तब करण्यात आला. हा विशेष निधी प्राप्त झाल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करण्यासठी कोल्हापूर भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. मंत्री झाल्यानंतर नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न अत्यंत चांगल्या पध्दतीने मार्गी लावले आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे नृसिंहवाडी येथील कन्यागत पर्वासाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यानंतर श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थानचा अनेक वर्षे प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लावला. या विकास योजनेमुळे निवास व्यवस्था, चोपडाईदेवी मंदिर येथे दर्शन मंडप, भूमिगत विद्युतवाहिन्या, एस.टी. स्टॅन्ड येथे स्वच्छतागृहे, खुले सभागृह, सांडपाण्याचा पुनर्वापर, खतनिर्मिती या व्यवस्था पूर्ण होणार आहेत. सांडपाण्याचा पुनर्वापार, घनकचरा व्यवस्थापन, रेन वॅाटर हार्वेस्टिंग इत्यादी वैशिष्टे असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रोल मॉडेलचे कौतुक केले आहे. या निधीमुळे येत्या वर्षभरात या संपूर्ण परिसराचा विकास साधण्यास मदत होणार आहे.
भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आगामी काळात याच पद्धतीने विविध देवस्थान परिसर, अभयारण्ये, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित पायाभूत मुलभूत सुविधा इत्यादींसाठी जिल्याचे पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील विकासाचे नवे पर्व कोल्हापुरात आणत आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठीनाम.चंद्रकांतदादा पाटील प्रयत्न करीत आहेत.याबद्दल त्यांचे व महाराष्ट्र सरकारचे विशेष अभिनंदन जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, संतोष भिवटे, सुभाष रामुगडे, उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, श्रीकांत घुंटे, दिलीप मेत्राणी, मारुती भागोजी, गणेश देसाई, आर.डी.पाटील, संपतराव पोवार तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकते यांच्यावतीने करण्यात येत आहे.
Leave a Reply