काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेमधील प्रमुख अडथळा दूर

 

कोल्हापूर : महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियोजन मंडळाची ९४ वी बैठक आज आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अमल महाडिक यांनी मा जलसंपदा मंत्री ना गिरीष महाजन सो यांच्या अध्यक्षते खाली व जलसंपदा राज्य मंत्री ना विजय शिवतारे सो तसेच ताराराणी गटनेते सत्यजित कदम, भाजप गटनेते विजय सुर्यवंशी, नगरसेवक आशिष ढवळे, नगरसेवक शेखर कुसाळे यांचे उपस्थितीत मंत्रालयातील दालनात आयोजित केली होती.

कोल्हापूर शहर पाणी पुरवठा योजना,  काळमवाडी उद्धभव१८०० मिलीमीटर व्यासाची गुरुत्व वाहिनी जॅकवेल PPT ते पुईखडी कोल्हापूर एकूण लांबी ५३ किलोमीटर पैकी पाटबंधारे खात्याच्या कालव्याच्या निरीक्षण पथाच्या बाजूने टाकवयाच्या १२ किमी अंतर्गत पाइपलाइन व हेड वर्क्स च्या कामाच्या जागेच्या मोबदल्या पोटी पैसे भरणे बाबतचा प्रश्न बऱ्याच कालावधी पासून प्रलंबित होता.  पाटबंधारे खात्याने प्रचलित दरानुसार भाडे वार्षिक रुपये २ कोटी  पर्यंत द्यावे लागत असलेने काम रखडले होते.  सदरचे भाडे भरणे कोल्हापूर महापालिकेच्या आर्थिक स्थितीस अनुसरुन नव्हते. बैठकी मध्ये सदरचे भाडे हे वार्षिक १ रुपये नाममात्र एवढे ठरविण्यात आले असून यामुळेमहापालिकेची २ कोट रुपयांची बचत झाली आहे आणि कोल्हापूर शहराच्या थेट पाईपलाईन योजनेचा प्रमुख अडसर दूर झाला.

या बैठकीस कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, प्र जल अभियंता सुरेश कुलकर्णी व सहाय्यक अभियंता हेमंत गोंगाणे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!