
कोल्हापूर: कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरु असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामास गती प्राप्त झाली असून या योजनेतील प्रमुख अडथळा दूर झाला आहे.या योजेनेचे काम पाटबंधारे विभागाच्या जागेतून करण्यास नाममात्र भाडे आकारण्यात येण्यात असल्याने भाड्याचा प्रश्न निकालात लागला आहे.जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी थेट पाईपलाईन ही शहरासाठी किती गरजेची आहे याची दाहकता पटवून दिली.याआधी अधिवेशनात आमरण उपोषण केल्याने या योजनेला लगेच मंजुरी दिली गेली.पण जागेच्या भाड्याबाबत पाटबंधारे आणि महापालिका यांच्यात एकमत होत नव्हते.महापालिकेस जागेसाठी वार्षिक 2 कोटी रुपये महापालिकेस देणे शक्य नसल्याने हे काम या कारणासाठी अडखळू नये म्हणून भाडे माफ करावे अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी नामदार शिवतारे यांना केली असता माफक भाडे देऊन जागा हस्तांतरित न करता याला मान्यता देण्यात आली.यामुळे या योजनेतील महत्वाचा अडथळा आता दूर झाला असल्याने लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास नेणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.फक्त श्रेय घेण्यासाठी न केलेली कामे स्वतः केली असे सांगू नये तर खरोखर लोकांच्या हिताची कामे त्यांनी करावीत असा टोलाही त्यांनी लगावला.
Leave a Reply