
कोल्हापूर: सध्या अस्तितवात असणारे बी,सी,ओबीसी व एस.टी,यांना शिक्षण व नोकरीमध्ये मिळणारे आरक्षण ज्यांना आजवर कधीच आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही अश्याच लोकांना आणि कुटुंबाना आरक्षण मिळावे,तसेच आर्थिक निकषावर मराठा समाजासाहित अन्य समाजांना आर्थिक निकषावर शिक्षण आणि आरक्षण मिळावे,तसेच या सर्व विचारांचा विचार करण्यासाठी घटनेतील ३४० कलम नुसार आयोगाची स्थापना करावी ही प्रमुख मागणी या परिषेदत करण्यात येणार असून येत्या २५ मार्च रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे ही परिषद होणार आहे.आरक्षणाबाबत परत एकदा विचार व्हावा यासाठी भाजप अनुसूचित मोर्चाचे प्रमुख राष्ट्रीय दलित नेते त्तर प्रदेश येथील शांत प्रकाश जाटव, संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष व मराठा आरक्षण चळवळीचे अभ्यासक प्रवीण गायकवाड भारतीय आरक्षण मुक्ती दलाचे अध्यक्ष अलोककुमार पांडे,राष्ट्रीय आझाद मंचच्या राष्ट्रीय महासचिव सौ.स्वागतिका पती यांच्यासह देशभरातून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि यावर बहुमोल चर्चा होणार आहे.अशी माहिती संयोजक सुनील मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.यावेळी समी भाले,ऋषिकेश मोहिते यांच्यासह आरक्षण पुनर्विचार चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply