
कोल्हापूर: भाजपा कोल्हापूर महानगर फुलेवाडी रिंगरोड शाखेचे तसेच पाणपोईचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सरचिटणीस देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आले.
कोल्हापूर महानगर भाजपाच्यावतीने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व ८१ प्रभागात संघटना विस्तारासाठी शाखा स्थापन करण्याचे नियोजन सुरु आहे. या अंतर्गतच आज फुलेवाडी रिंगरोड प्रभागामध्ये जिल्हा सरचिटणीस श्री अशोक देसाई यांच्या संकल्पनेतून शाखेची स्थापना तसेच उन्हाळ्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या सोईसाठी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले, केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार अत्यंत दमदारपणे जनविकासाची कामे करत आहे. विकासाला केंद्रबिंदू मानून जाती-पाती विरहीत समाज कारणाचे अनेक लोककल्याणकारी निर्णय देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी, व महाराष्ट्राचे मुख्यंमत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून घेतले जात आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शाखेच्या माध्यमातून कार्यरत राहावे असे आवाहन केले.
जिल्हाध्यक्ष संदीप देसाई म्हणाले, कोल्हापुरचे भुमिपुत्र तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्हाचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांच्या या विकासाच्या भूमिकेला ठाम पाठिंबा देण्यासाठी उपनगरातील तसेच कोल्हापूर महानगरातील भाजपा शाखेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी समाजकारणामध्ये कार्यरत राहून त्यांचे हात बळकट करावे असे सांगितले.
जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले, या शाखेच्या माधमातून प्रभागातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील. तसेच या पाणपोई बरोबरच येत्या काही दिवसांत येथे सार्वजनिक वाचनालय सुरु करण्याचे नियोजन केले आहे. संघटन विस्तारासाठी या प्रभागातून बूथ रचनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष श्री हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, श्रीकांत घुंटे, संजय सावंत, निलेश आजगांवकर, अक्षय मोरे, राजू जाधव, संतोष माळी, रविंद्र घाटगे, गिरीष साळोखे, गणेश मोरे, राजनीत काटकर, विनायक पाटील, राजाभाऊ कोतेकर, सुनील जाधव, विनायक मोरे, अनिल थोरात, शेखर गोसावी, वल्लभ देसाई, बबलू बोंगाळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply