जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा शौमिका महाडिक अध्यक्षा; सर्जेराव पाटील उपाध्यक्ष

 

कोल्हापूर: अत्यंत चुरस आणि प्रचंड उत्सुकता ताणलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली आहे.भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांची अध्यक्षपदी तर सेनेचे सर्जेराव पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.भाजपच्या शौमिका महाडिक यांनी कॉंग्रेसच्या बंडा माने यांचा ९ मतांनी पराभव केला.त्यांना ३७ मते मिळाली तर विरोधी उमेदवार बंडा माने यांना २७ मते मिळाली.अशीच मते उपाध्यक्ष निवडीवेळीही कायम राहिल्याने शिवसेनेच्या सर्जेराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जयवंत शिंपी यांचा तितक्याच फरकाने पराभव केला.
.राष्ट्रवादीचे विजय बोरगे आणि कॉंग्रेसच्या रेश्मा राहुल देसाई हे दोन सदस्य मतदानाला गैरहजर राहिले.
या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती आखत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती.मात्र शिवसेनेतच फूट पडल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला ऐनवेळी आपला उमेदवार द्यावा लागला.भाजपने मतदानापूर्वीच आपल्या मतांची बेजमी करून ठेवत ती कायम राखण्यात यश मिळवले.आणि मॅजिक फिगर गाठली.
आम.चंद्रदीप नरके,सत्यजित पाटील,सुजित मिणचेकर आणि आवाडे गटाचे दोन सदस्य यांनी पाठीम्बा दिल्याने भाजप,जनसुराज्य आघाडीला विजयी होता आले.केंद्र राज्य आणि जिल्हा परिषद इथेही भाजपचाच झेंडा फडकला.चंद्रकांत दादा यांचे नेतृत्व यशस्वी ठरले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!