चित्रपट महामंडळाच्या वेबसाइटचे शानदार उद्घाटन

 

कोल्हापूर : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वेब साईटचे मुंबईत एका शानदार समारंभात उद्घाटन करण्यात आले. www.chitrapat mahamandal. com नावाची वेब साईट अष्टविनायक मिडिया एण्ड एंटरटेन्मेंट यांनी तयार केली असून साईट चा फस्ट टेक स्वप्निल जोशी व मान्यवरांच्या हस्ते मुंबई येथील रविंद्र नाट्य मंदिरात करण्यात आला. तसेच चित्रपट महामंडळाचे ABMCM नावाचे मोबाईल अप्लिकेशन तयार करण्यात आले आहे त्यात आगामी चित्रपट, गाणी ट्रेलर तसेच मराठी चित्रपटांसाठी आवश्यक सर्व गोष्टी पहायला मिळतील त्यामुळे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यन्त पोहचेल. यासाठी महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, मिलिंद अष्टेकर ,सुभाष भुरके, संजीव नाईक, सतिश बिडकर, विजय कोंडके, अनिल कदम, प्रसाद सुर्वे, अलका कुबल, प्रिया बेर्डे, सदानंद सुर्यवंशी, इम्तियाज बरगिर, बाळ कृष्ण बरगिर, सतीश रणदिवे, व्यवस्थापक रविंद्र बोरगावकार यांनी पुढाकार घेऊन सहकार्य केले. महामंडळाचे वर्षभरतील सर्व कार्यक्रम, फ़िल्म फेस्टिवल, शासकीय माहिती ऍप व वेबसाइट वर दिली आहे तरी लोकांनी ती डाउनलोड करून वेबसाइट ब्राउज करावी असे आवाहन महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!