
कोल्हापूर : येथील जैन मठाचे प्रमुख डॉ. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनासाठी एक लाख रुपये इतक्या रकमेचा विश्वस्त निधी प्रदान केला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी या निधीच्या धनादेशाचा स्वीकार केला.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिक्षणाप्रती अत्यंत सजग असणाऱ्या महास्वामींनी स्वतः पीएचडी करण्याइतकी तळमळ दर्शविली आहे. ही बाब सर्वच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आदर्शवत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून विद्यापीठास निधी प्रदान करण्यात आला, हा विद्यापीठाचा सन्मान आहे, अशी भावना आहे. या निधीचा विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सदुपयोग करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.
विद्यापीठ कार्यालयात काल सायंकाळी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, भगवान महावीर अध्यासनाच्या संचालक डॉ. पद्मजा पाटील यांच्यासह प्रा. डी.बी. खणे, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, प्राचार्य राजेंद्र लोखंडे यांच्यासह जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply