
मुंबई:रंगपंचमीच्या रंगात रंगून झालं की मराठी मनाला वेध लागतात ते नव्या वर्षाचे. गुढीपाडवा हा मराठी संवत्सराचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा सण मराठी माणसांसाठी महत्त्वाचा. मराठी सणांचा मानबिंदू समजल्या जाणा-या गुढीपाडव्याचा हा उत्साह मनोरंजन क्षेत्रासाठी तर विशेष असतो. असा हा परंपरागत गुढीपाडवा यंदा स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना वेगळ्या अंदाजात पाहता येणार आहे. यंदाच्या गुढीपाडव्यात अनेक मालिकांची कथानके नव्या वळणावर आली आहेत.
अग्नीफेऱ्याच्या प्रसंगानंतर ‘गोठ’मधल्या राधा आणि विलास यांच्या नात्यात आलेला दुरावा काहीसा निवळला असून यंदाच्या गुढीपाडव्यात परस्परांमधले मतभेद दूर करून विलास आणि राधा किमान आपण चांगले मित्र बनूया असे ठरवतात,त्यांच्यातली ही जवळीक दूर करण्यासाठी बयोआजी गुढीपाडव्याला एक अनपेक्षित खेळी खेळतात
आम्ही दोघे राजाराणी मधल्या सध्या एकत्र राहणाऱ्या नाईक आणि लेले कुटुंबातले दे धमाल ताणतणाव गुढीपाडव्याला वेगळ्याच वळणावर येतात.लेले आपल्या कुटुंबाची गुढी नाईक यांच्या बंगल्यात उभारण्याचे ठरवात, नाईक त्याला नकार देतात. यातून पुढे काय होते,पार्थ-मधुराचा हा गुढीपाडवा कसा साजरा होतो.याची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
लोकप्रियतेचे उच्चांक गाठलेल्या ‘पुढचे पाऊल’ मध्ये सरदेशमुख कुटुंबात सुरु असलेल्या सून नंबर – १ या स्पर्धेने वेग पकडला असून घरातली महत्वाची व्यक्ती म्हणून यंदा ऑस्ट्रेलियामधून परतलेल्या रोहितने गुढी उभारावी असे सायलीचे म्हणणे आहे.अक्कासाहेब हा कुटुंबातला संघर्ष कसा हाताळणार,दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे समीर आणि कल्याणी गुढी उभारू शकतील का ? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
‘लेक माझी लाडकी’ मध्ये मीरा ही आदित्य आणि इरावतीची मुलगी असल्याचा गौप्यस्फोट झाल्यानंतर आता मीरा,तिच्या बाबांच्या म्हणजे आदित्यच्या घरी राहायला जाते, मीरा शिवायच्या पहिल्या गुढीपाडव्यामुळे सानिका विशेष आनंदी आहे मात्र सासू सुशीला आणि नवरा साकेतला मात्र त्यांच्या घरातली एक सदस्य म्हणून वाढलेल्या मीराची कमतरता जाणवते आहे.
नव्या वर्षात मालिकांच्या मुख्य पात्रांच्या आयुष्यात घडणारे हे बदल आणि त्याला पारंपारिक सणाची जोड,उत्साह आणि आनंदाचा माहौल हे यंदाच्या स्टार प्रवाहच्या गुढी पाडवा विशेष भागांचे वैशिष्ट्य आहे.
Leave a Reply