मुंबई : महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेतंर्गत राज्यातील 154 गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आली असून त्यापैकी 11गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. सन 2015-16 या वर्षासाठी या गावांची घोषणा नुकतीच करण्यात आली.
गावात तंटे होऊ नयेत तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी. सामाजिक शांतता प्रस्थापित होऊन राज्याची समृध्दीकडे वाटचाल व्हावी, या उद्देशाने 15 ऑगस्ट, 2007पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राज्यात सुरु करण्यात आली आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतंर्गत राज्यात आतापर्यंत 18 हजार 993 गावांना तंटामुक्त पुरस्कार देण्यात आला आहे. तर 1 हजार 298 गावांना विशेष शांतता पुरस्कार देण्यात आला आहे.
मोहिमेच्या 9व्या वर्षातील अंमलबजावणी कार्यक्रमानुसार 15 ते 30 ऑगस्ट, 2016 या कालावधीत राज्यातील 154 ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन या मोहिमेत सहभाग घेतला होता. या मोहिमेतंर्गत तंटामुक्त गाव समितीने, भविष्यात तंटे निर्माण होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन गावात दाखल असलेल्या दिवाणी,महसुली व इतर तंट्याची माहिती संकलित करुन,दाखल तंटे व नव्याने निर्माण झालेले तंटे लोकसहभागातून सामोपचाराने मिटविण्याची कार्यवाही केली आहे.यातकोल्हापूर जिल्हा – मळगे बू. मादयाळ (ता. कागल), नेसरी (ता. गडहिंग्लज चा समावेश आहे.
Leave a Reply